breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणीचा फोटो अश्लिल साईटवर अपलोड, तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – तरुणीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल करून “आता बघ मी तुझे काय करतो”, अशी व्हॉट्सअपद्वारे धमकी देणा-या तरुणावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे. हा प्रकार गुरूवारी (दि. 21) वाकड येथील कस्पटे वस्ती याठिकाणावरून केल्याचे उघडकीस आले आहे.

कामील शब्बीर मोहम्मद (वय 32, रा. मुळगाव अजनी, रेल्वे क्वार्टर, नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामील याने तरुणीचा फोटो मोबाईलद्वारे इंटरनेट साईटवर अपलोड केला. त्यानंतर त्याने तरुणीला व्हॉट्सअपद्वारे आता “तु टेशन घे, बघ आता मी काय करू शकतो”, अशी धमकी देखील दिली. त्यानंतर वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. त्याने व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम मेसेज हॅक केले आहेत. त्यांचा फोटो अश्लिल वेब साईटवर अपलोड केल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button