breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यात कोरोनामुळे आणखी दोन बळी, आठ नवे कोरोनाबाधित

अकोला : शहरात करोनामुळे मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र अद्याापही कायम आहे. शहरात करोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृत्यू संख्या ३९ वर पोहोचली. आठ नवीन रुग्णांचीही सोमवारी भर पडली. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८२१ झाली. सध्या २३७ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाचा उद्रेक वाढतच आहे. मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. शहरात आणखी दोन मृत्यू व आठ नव्या रुग्णांची नोंद सोमवारी झाली. जिल्ह्यातील एकूण १०६ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ९८ अहवाल नकारात्मक, तर आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ८२१ झाली. आजचे दोन मृत्यू धरुन आतापर्यंत ३९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाने आत्महत्या केली. दरम्यान, आज पहाटे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा ४५ वर्षीय रुग्ण नायगाव येथील रहिवासी होता. ३ जून रोजी या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी आणखी एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३६ वर्षीय महिला रुग्ण हैदरपूरा खदान येथील रहिवासी होती. २ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

आज सकाळच्या अहवालानुसार आठ जण नवे करोनाबाधित आढळून आले. यामध्ये सात पुरुष व एका महिलेचा समावेश आहेत. त्यामध्ये रजतपूरा येथील दोन, तर बेलोदे लेआऊट, कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फैल, हनुमान बस्ती, माळीपूरा व गायत्री नगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ४६ अहवाल नकारात्मक आले. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. शहरात घरोघरी सव्र्हे करून आरोग्य तपासणी सुरू आहे. करोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण व रुग्ण संख्या वाढत असल्याने शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आतापर्यंत ५४०५ अहवाल नकारात्मक
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ६३०० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६०२०, फेरतपासणीचे ११२ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६२२६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ५४०५ आहे, तर सकारात्मक अहवाल ८२१ आहेत.
६६.३८ टक्के रुग्ण करोनातून बरे
जिल्ह्यात करोनातून बरे होणाºयांचे प्रमाण ६६.३८ टक्के आहे. आतापर्यंत ५४५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारी सोडण्यात आलेल्या पाच जणांचा समावेश आहे. त्यामध्ये एक महिला व अन्य चार पुरुष आहेत. त्यातील दोन जणांना घरी तर उर्वरित तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघे जण शहर कोतवाली परिसरातील तर देशमुख फैल व गायत्री नगर येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button