breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus : चिकन पेक्षा फणसाचे दर दुप्पट

कोरोना विषाणूमुळे चिकन आणि मासे खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलं आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे चिकन, मटण, मासे विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे. भीतीनं अनेकजण याकडे फिरकतही नाही, अत्यंत स्वस्त दरात चिकन विकलं जात आहे, तर दुसरीकडे याच कोरोनामुळे अनेक राज्यांत फणसाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. 

चिकन- मटणला पर्याय म्हणून कच्च्या फणसाच्या मागणीत वाढ झाली आहे. कच्च्या फणसापासून अनेक स्वादिष्ट पाककृती केल्या जातात. आता फणसाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मांसांहाराला पर्याय म्हणून अनेकजण कच्च्या फणसाकडे वळत आहेत. देशात अनेक ठिकाणी कच्च्या फणसाचे  दर हे चिकनच्या दरापेक्षाही अधिक झाले आहेत. 

५० रुपये प्रतिकिलो दरानं विकला जाणारा फणस कोरोनामुळे १२० रुपये प्रतिकिलोदरानं विकला जात आहे. चिकन किंवा मटण बिर्याणीपेक्षा ‘कटहल  बिर्याणी’ म्हणजेच फणसाच्या बिर्याणीची मागणी वाढली आहे, असं काही विक्रेते सांगत आहेत. 

अचानक मागणी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी कच्चा फणस बाजारात उपलब्धच नाही अशी तक्रारही ग्राहक करत आहेत. एकीकडे अनेक ठिकाणी चिकन ८० रुपये किलो दरानं विकत असताना फणसाच्या किमतीत मात्र दुप्पटीहूनही अधिक वाढ झाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button