breaking-news

#CoronaVirus: कोरोनाचा फटका निर्यात बंद झाल्याने तांदूळ स्वस्त; बासमतीचे भाव घसरले

औरंगाबाद | महाईन्यूज

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात थंडावली आहे. निर्यातीअभावी बासमतीचे भाव क्विंटलमागे अडीच हजार ते तीन हजार रुपयांनी गडगडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव कमी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. घाऊक बाजारपेठेत पूर्वी ९००० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या प्युअर बासमतीचे भाव गडगडून सध्या ६५०० ते ९००० रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहे. देशात बासमती धानचे उत्पादन चांगले झाले. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच युरोपमध्ये तेथील सरकारने अन्नधान्य प्रशासनाने खाद्यपदार्थ निर्जंतुक जंतुनाशकाच्या नियमावलीमध्ये बदल केला.

इराण व युरोपच्या निर्यातीच्या धोरणामध्ये बदल झाल्यामुळे बासमतीचा निर्यातीवर परिणाम झाला. यामुळे सुरुवातीलाच बासमतीचे भाव १ हजार रुपयांनी कमी झाले होते. त्यात आता कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांनी आयात बंद केली. त्याचा परिणाम देशातून होणाऱ्या बासमती निर्यातीवर झाला. यामुळे मागील १० दिवसांत आणखी दीड ते दोन हजार रुपयांनी बासमतीचे भाव घसरले. एवढेच नव्हे तर नॉन बासमतीच्या भावातही क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घसरण होऊन आजघडीला ३८०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल विकले जात आहे. याआधी नॉन बासमती तांदळाला निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणारी ५ टक्के सबसिडी यंदा केंद्र सरकारने बंद केली आहे. परिणामी, खुल्या बाजारात धानचे दर कोसळले. यामुळे सुरुवातीला नॉन बासमती तांदळाचे भावही घटले होते, अशी माहिती व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. यंदा ग्राहकांना कमी किमतीत बासमतीच्या भाताची चव चाखता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button