breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक संदीप वाघेरे यांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरीगाव येथील नगरसेवक संदीप वाघेरे यांना भारतीय जनता पार्टीकडून शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसात त्यांच्याकडून खुलासा मागविला असून समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करु, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी डाॅक्टरांना शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचा आरोप तेथील डाॅक्टरांनी केला. तसेच वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंदचा पवित्रा घेत आंदोलन केले आहे. त्यावर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आपण डॉक्टरला मारहाण केलेली नसून रुग्णावर केलेल्या चुकीच्या उपचाराचा जाब विचारल्याचे म्हटले आहे.

डाॅक्टरांच्या आंदोलनाची स्थानिक भाजप आमदार, महापालिका पदाधिकारी, आयुक्तांनी दखल घेवून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडाले. तसेच डाॅक्टरांचे प्रश्न सामोपचाराने सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले.

दरम्यान, कोविड महामारीत डाॅक्टर स्वताःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. त्या डाॅक्टरांना शिवीगाळ करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पक्षाच्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारे वागणे हे बरोबर नाही. भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक संदीप वाघेरे यांना तत्काळ शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांचे डाॅक्टरांना शिवीगाळ करण्याचे कृत्य चुकीचे आहे. त्यांच्या बेशिस्त वागण्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे. त्याच्या गैरवर्तनामुळे पक्षाला बाधा निर्माण होत असून असमाधानकारक खुलासा न आल्यास त्याच्यावर पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे भाजप नगरसेवकांनी पक्ष विरोधी काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button