breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांचा कार्यकाळ संपुष्टात, शासकीय गाडी आणि कार्यालय प्रशासनाच्या स्वाधीन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला. शिक्षण प्रशासनाने सभापती मनिषा पवार यांची शासकीय गाडी आणि कार्यालय ताब्यात घेतले. सध्या कोविड 19 आपत्ती असल्यामुळे नवीन सभापतीची निवड प्रक्रिया घेण्यासाठी महापालिकेला राज्य शासनाच्या आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

राज्यात मागील पंचवार्षिकीत भाजपची सत्ता आल्यानंतर फडणवीस सरकारने राज्यातील सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करून त्याजागी शिक्षण समिती नेमण्याचा निर्णय घेतला. परंतु, सभापतींची निवड प्रक्रिया राज्य शासनाने स्वतःकडे राखून ठेवल्या. राज्य शासनाच्या आदेशानंतर गेल्यावर्षी शिक्षण समिती स्थापन करून सभापती पदावर थेरगावच्या नगरसेविका मनिषा पवार यांची 13 ऑगस्ट 2019 रोजी नियुक्ती झाली. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2020 रोजी संपला आहे. शिक्षण प्रशासनाने सभापती पवार यांची शासकीय गाडी ताब्यात घेतली. त्यांचे कार्यालयही प्रशासनाच्या स्वाधीन झाले आहे.

आता सभापती पदावर नवीन नगरसेवकाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी महासभेत ठराव करावा लागणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्त सभापती पदाची निवड प्रक्रिया घेतील. परंतु, सध्याची कोविड 19 आपत्ती पाहता या निवड प्रक्रियेला कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित ही निवड प्रक्रिया लांबणीवर पडू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button