breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

धक्कादायक! ऊर्जामंत्र्यांच्या नागपूरमध्ये वाढीव विज बिलामुळे एकाची आत्महत्या

नागपूर: लॉकडाउनच्या काळात आलेल्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांना चांगलाच दरवाढीचा फटका बसलेला आहे. वीज बिल कमी करावे अशी मागणी एकीकडे होत असताना नागपूरमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. नागपूरमधील यशोधानगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलेली आहे. लीलाधर गायधणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लीलाधर गायधणे यांना एकत्रित तब्बल 40 हजार रुपयांचे वीज बिल आलेले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्यामुळे गायधणे अस्वस्थ झालेले होते.

गायधने यांनी बिल कमी करावे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केलेली होती. पण, अनेकदा प्रयत्न करुनंही वीज बिल कमी झालेलं नव्हत. वीज बिल भरले नसल्याने वीज खंडीत होण्याची गायधणे यांना भीती होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केलेली आहे.  नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, गायधणे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button