breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

जम्बो कोविंड सेंटरमधून मुलगी बेपत्ता?, लेकीसाठी ‘या’ माऊलीवर उपोषणाची वेळ

माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल रागिणी गमरे यांनी प्रशासनाला केलाय

पुणे |महाईन्यूज|

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 33 वर्षीय प्रिया गायकवाड या महिलेला तिच्या आईनं पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलं होतं. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं. मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. मात्र, जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी आता या माऊलीला उपोषणचा मार्ग निवडवा लागला आहे. रागिणी सुरेंद्र गमरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड यांचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी वर्तवला आहे. माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल रागिणी गमरे यांनी प्रशासनाला केला आहे. रागिणी गमरे यांनी आपल्या बेपत्ता लेकीसाठी जम्बो कोविड सेंटर समोरच आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी गमरे म्हणाल्या की, माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझ्या मुलीला जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हातवर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय मिळायला हवा. कोटी रूपये खर्च करून आणि शासनानं ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे याठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधितावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button