breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा उद्रेक; अहमदाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवलेला आहे. गेल्या काही महिन्यांत दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे विभागामार्फत श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केली आहे. मात्र देशाच्या काही भागांत अजुनही मजूर व कामगार अडकून पडले आहेत. गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचा सातत्याने उद्रेक होताना पहायला मिळतो आहे. अहमदाबादमध्ये घरी जाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या १०० परप्रांतीय कामगारांनी पोलिस आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जमखी झाले असून जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या व लाठीचार्जचा वापर करावा लागला. “रस्त्यावर आलेल्या मजुरांना ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच दगडफेक केली. वस्त्रापूर भागात दोन पोलिसांच्या गाड्या, एक खासगी कार्यालय, आणि कन्स्ट्रक्शन साईटची कामगारांनी नासधूस केली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत.” अहमदाबादचे पोलिस उप-आयुक्त प्रवीण मल यांनी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button