breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली”, चंद्रकांत पाटलांचा आरोप

मुंबई |

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. दरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असं म्हणत विरोधकांना सुनावलं होतं.

त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली असल्याचा आरोप केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. “भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली. आमच्या कार्यकर्त्याने काही म्हटलं असेल तर ते सरकारला म्हटलं असेल. सरकार हरामखोर वैगेरे…पण भास्कर जाधव यांना तुम्ही असं कोणी म्हटलं नाही. पण भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button