breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: गरजू लोकांना देणार आता ‘मोदी किट’,काय असणार या मोदी कीटमध्ये ?

कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गरीबांचे मोठे हाल सुरु आहेत. जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही त्यांना झगडावे लागत आहे. याचदरम्यान राज्य सरकार आणि केंद्रसरकार या संकटाला सामोरे जात असलेल्या लोकांना पुरेपुर मदत करण्याचा प्रयत्न करत आहे… केंद्र सरकार आता अशा गरजू लोकांना ‘मोदी किट’च्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य देणार आहे…

लॉकडाऊन काळात गरीबांना दिल्या जाणाऱ्या या किटमध्ये तांदूळ, डाळ, बिस्किट, तेल आणि साबणासारख्या वस्तू असतील. याबाबत भाजपच्या हायकंमाडने सर्व प्रदेश कार्यकारिणीला अशा पद्धतीचे किट वाटण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. 

यापूर्वी भाजपने गुरुवारी महाभोज अभियान सुरु केले. त्याअंतर्गत भाजपकडून पक्षाच्या एक कोटी कार्यकर्त्यांना पाच गरजू लोकांना भोजन देण्यास सांगितले होते. पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा हे दररोज देशभरात सुरु असलेल्या या अभियानाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेत आहेत.  भाजप नेते कपिल मिश्रा यांनी याबाबत टि्वट केले आहेत. त्यांना या किटमध्ये देण्यात येणारी सर्व यादी शेअर केली आहे. 

तत्पूर्वी, केंद्र सरकारने देशातील गरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेज अंतर्गत गरजूंना विविध प्रकारची मदत केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button