breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

राहुल कलाटे यांची सांगवीत पदयात्रा; चिंचवडमध्ये सर्वत्र शिट्टीचाच बोलबाला!

शिट्टीच्या आवाजाने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली

पिंपरी : ढोल, ताशांचा गजर, मन गुंगणारी ताला-सुरातील विकासाची गाणी नागरिकांना ऐकवत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची गुरुवारी ( ता. २३) सांगवीत पदयात्रा निघाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वत्र शिट्टीचा आवाज घुमत होता. या पदयात्रेला मिळालेला तुफान प्रतिसाद आणि शिट्टीच्या आवाजाने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.

पदयात्रेची सुरुवात जुनी सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरापासून झाली. उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह या भागात मोठी राजकीय ताकद असलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी दोघांनाही खांद्यावर उचलून घेतले होते. पदयात्रा शितोळेनगर मार्गे आनंद नगर, दाते नगर, गंगा नगर, ढोरे नगर, पवना नगर, मुळा नगर, मुठा नगर, संगम नगर, ममता नगर, मधूबन सोसायटी, ममता नगर, नवी सांगवी ते पिंपळे गुरव, साई चौक, फेमस चौक, क्रांती चौक, कृष्ण नगर, काटे पूरम चौक, रामकृष्ण चौक, शिवाजी चौक, पिंपळे गुरव गावठाण, सृष्टी चौक, कल्पतरू, काशीद पार्क असा दीर्घ पद यात्रेचा मार्ग होता. पिंपळेगुरव येथे पदयात्रेची सांगता झाली.

पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. एकच वादा राहुलदादा, कोण आले रे कोण आले राहुलदादा आले अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राहुल कलाटे यांच्या पदयात्रेचे ठिकठिकाणी मंडप घालून, सुवासिनींकडून , तरुणींतर्फे जंगी स्वागत करण्यात येत होते. रविवारी (ता. २६) दहाव्या क्रमांकाचे शिट्टीचे बटण दाबून राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन कार्यकर्ते नागरिकांना करीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button