breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार

पुणे : सातत्याने वाढणारे कोरोना रुग्ण आणि वाढता मृत्यूदर यावर नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतलेला आहे. पुणे मनपाने 1 लाख नागरिकांची कोव्हिड-19 टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 1 लाख कोरोना चाचणी किट घेण्यात येणार आहेत.

पुणे महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचणीच्या प्रतिकिट 450 रुपये दराने 1 लाख कीटसाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या खरेदीस मान्यता दिली आहे. या किटचा उपयोग फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या, अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या, ह्रदय विकार, फुप्फुस, यकृत मुत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब विकार असलेल्या, त्याचप्रमाणे केमो थेरपी, एचआयव्ही बाधित, अवयव प्रत्यारोपण केलेले किंवा वयोवृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयांमध्ये ही तातडीची चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे शहरात काल (23 जून) दिवसभरात 467 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 273 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या शहरात 277 गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात 57 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 153 इतकी झाली आहे. यातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 12 हजार 408 आणि ससून रुग्णालयात 745 रुग्ण आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4 हजार 680 इतकी आहे. आतापर्यंत पुणे शहरात एकूण 528 मृत्यू झाले आहेत. तर पुणे शहरात उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या 7 हजार 945 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यात काल (23 जून) दिवसभरात 820 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 851 इतकी झाली आहे. काल जिल्ह्यातील 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यूंची संख्या 617 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button