breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: ‘कोरोना एक्स्प्रेस’ संबोधून ममतांकडून स्थलांतरितांचा अपमान- अमित शहा

श्रमिक विशेष गाडय़ांनी राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांना करोना एक्स्प्रेस असे संबोधून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा अपमान केला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. आता हेच स्थलांतरित कामगार २०२१ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवतील, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा उद्योगधंदा सुरू असल्याची टीकाही शहा यांनी तृणमूल सरकारवर केली. अल्पसंख्याक समुदायाला खूश करण्यासाठी ममता बॅनर्जी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध करीत असून राज्यातील जनता ममता यांना राजकीय निर्वासित बनवतील, असेही शहा म्हणाले.

उत्तर प्रदेशात १७०० तर बिहारमध्ये १५०० विशेष श्रमिक गाडय़ा आल्या. मात्र पश्चिम बंगालमध्ये आलेल्या गाडय़ांना ममता यांनी करोना एक्स्प्रेस असे संबोधले, ते ऐकून आपण सुन्न झालो, ममता यांनी स्थलांतरितांचा अपमान केला आहे, त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, आता हीच करोना एक्स्प्रेस तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल, असेही गृहमंत्र्यांनी जनसंवाद मेळाव्यात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button