breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

एसटीच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी द्या: आमदार महेश लांडगे

  • राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील परिवहन महामंडळाच्या आंतराज्य वाहतुकीसाठी परवानगी द्यावी. त्याद्वारे आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवशांची प्रवास सुविधा पूर्ववत करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत चालू आहे. दुसऱ्या लाटेनंतर एसटी बसेस देखील चालू झाल्या. परंतु, आंतरराज्य वाहतुकीसाठी अजूनही परवानगी नसल्यामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारात केवळ दोन गाड्या सुरू आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांनी कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या शासनाकडे पत्रव्यवहार, संपर्क साधून बसेस सुरू करण्याची विनंती केली. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे या मार्गावरील बसेस अजूनही बंद आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काही प्रमाणात कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या राज्यांत एसटी बसेस सुरू झाल्या होत्या. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला होता. परंतु, नंतर कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सुरूवातील कर्नाटक सरकाने ‘आरटीपीसीआर’ चाचणीची अट घातली. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली.

अद्याप तेच नियम असल्यामुळे केवळ दोन गाड्या आंतरराज्य मार्गावरुन सुरू आहेत. सर्व मार्गांवर एसीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे उत्पन्नातही भर पडणार आहे. स्वस्त प्रवास असल्याने अनेकजण एसटीला प्राधान्य देतात. परंत, इतर राज्य सरकार एसटीला परवानगी देत नसल्याने सेवा बंद आहे. प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने आपणयाबात तात्काळ निर्णय घ्यावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button