breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहीद सैनिकाच्या कुटुंबाला पिंपरी-चिंचवड पालिका करणार पाच लाखांची मदत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

देशाच्या रक्षणासाठी उभे आयुष्य पनाला लावणा-या शहिद सैनिकाचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमधील असल्यास त्याच्या कुटुंबाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यापुढे 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आज स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमध्ये सैनिकांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. कुटुंब शहरात असले तरी कुटुंबातील सैनिक देशासाठी आपले आयुष्य पनाला लावत असतो. अशी अनेक कुटुंबे शहरात आहेत. त्यातील सैनिक देशसेवा करताना शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून यापुढे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत 5 लाख रुपये मदतनिधी देण्यात येणार आहे. त्याबाबतचा विषय आज स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला. त्याला सभापती संतोष लोंढे यांनी मंजुरी दिली. या मदतकार्यामुळे सैनिक कुटुंबाचे मनोबल निश्चितच उंचावणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button