breaking-newsताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय
#CoronaVirus: कोटा येथून विद्यार्थ्यांना घेऊन आलेली शेवटची बस पुण्यात दाखल
राजस्थानातील कोटा येथून पुण्यातील विद्यार्थ्यांना घेऊन शेवटची बस पुण्यात दाखल झाली. त्यामुळे इथं अडकून पडलेल्या पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता स्वारगेट बसस्थानकात ही बस पोहोचली. या बसमधून पुण्यात दाखल झालेले एकूण ७४ विद्यार्थी आणि ८ चालक यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.