breaking-news

#CoronaVirus: औरंगाबादमध्ये कोरोना संशयितांचा आकडा २ वर; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर उपचार सूरु

औरंगाबाद | महाईन्यूज

कोरोनाच्या संशयावरून शहरातील २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच शहरातील कोरोना संशयितांची संख्या दोन वर गेली आहे. त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच कोरोनाची लागण आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मित्र सौदी अरेबियातून आला असून त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याला सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरु झाला. यामुळे त्याला लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पण काळजीचे कारण नसून केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णाला भरती करण्यात आलेले आहे.

शहरात आतापर्यंत १४ रुग्ण कोरोना आयसोलेशन वार्डात आलेले आहेत. त्यापैकी १२ रुग्णांना घरीच वेगळं राहण्याचा सल्ला देण्यात आलेले असून त्यांच्यावर डॉक्टरांचे लक्ष आहे. तर एक रुग्ण घाटीत तर आज एक मिनी घाटीत भरती करण्यात आलेला आहे. लक्षणे आहेत म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, स्वबचा रिपोर्ट आल्यावर त्याबद्दल निश्चित बोलता येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button