breaking-newsताज्या घडामोडी

राज्याला कोरोनातून संकटमुक्त करण्यासाठी साई संस्थानही पुढे, 51 कोटींची केली मदत

राज्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये अनेक लोक , खाजगी संस्था, सेलिब्रिटी, मोठ्या कंपन्या असे अनेक स्तरावरून मदतीचे हात देशाला ,राज्याला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत..त्यातच आता कोरोनाविरोधातील लढाईसाठी शिर्डीचे साईबाबा संस्थान आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मदतीसाठी पुढे सरसावली आहे. साईबाबा संस्थानाकडून ५१ कोटींची तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची आर्थिक मदत मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली आहे.

साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले की, ‘कोरोनाच्या संकटास तोंड देण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकार सज्‍ज झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या वतीने या संकटाचा सामना करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला आहे.

त्याचसोबत, साईप्रसादालयाच्‍या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍ण आणि त्यांचे नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्‍दाश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डी बस स्‍थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्‍थानच्‍या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्‍वच्‍छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्‍क भोजन पुरविण्‍यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button