TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी, चिखलीतील वीज समस्या सोडवा : माजी महापौर राहुल जाधव

– महावितरण प्रशासनाकडे मागणी

पिंपरी । प्रतिनिधी
सातत्याने खंडित होणारा आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, वाढीव वीजबिले अशा अनेक तक्रारींमुळे जाधववाडी, चिखली, शिवतेजनगर, कुदळवाडी परिसरातील नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनाने कार्यवाही करुन वीज समस्या सोडवावी, अशी मागणी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी केली आहे.याबाबत महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली, कुदळवाडी परिसरात वर्षानुवर्षे वीज समस्या कायम असून महावितरणाकडून मात्र याबाबत कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली जात नसल्याने नागरिक व व्यावसायिक हतबल झाल्याचे चित्र आहे.

जाधववाडी परिसरातील बोल्हाईमळा, मधला पेठा, राजे शिवाजीनगर, पंतनगर, कुदळवाडी अशा अनेक ठिकाणी सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. ऐन सकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने चाकरमान्यांसह महिला वर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील अनियमित वीजपुरवठ्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तर दुसरीकडे वेळेत वीजबिल भरणाऱ्या नागरिकांचाही विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. बहुतांश नागरिकांचा वीज वापर कमी असूनही स्थिर आकारच वीजवापरापेक्षा अधिक भरावा लागत आहे. ज्यांचे बिल थकीत राहत आहे त्यांच्यावर प्रशासन त्वरित कारवाई करत असतानाच नियमित बिल भरणाऱ्यांनाही हा भुर्दंड का? असा सवालही माजी महापौर राहुल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, परिसरात सर्वसामान्य घरांसाठी २३२ व्होल्टेजने वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु सध्या जाधववाडी परिसरात ११० व्होल्टेजने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कमी जास्त व्होल्टेजने विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. तरी याबाबत योग्य ती उपायोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा. विजदाब वाढवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवून आवश्यक ते तांत्रिक बदल करावे. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन सोडविण्यात याव्यात. संबंधीत विभागाने परिसरातील व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात तसेच त्या सोडवण्यासाठी यंत्रणा राबवावी, अशीही माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button