breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणाच्या त्रासाला कंटाळून चिखलीतील तरुणीची आत्महत्या

पिंपरी |महाईन्यूज|

तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणीने पेस्ट कंट्रोलचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना चिखलीतील पाटीलनगर येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

आकांक्षा ज्ञानेश्‍वर पाटील (वय 23, रा. वेदांत अपार्टमेंट, पाटीलनगर, चिखली) असे तरुणीचे नाव आहे. सर्फराज युनुस पटवेकर (वय 35, रा. पीसीएमसी स्कूलसमोर, काळभोरनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आकांक्षा व सर्फराज हे आकुर्डीतील एका शोरूममध्ये एकत्र काम करीत होते. सर्फराज त्यांना वारंवार मानसिक त्रास देत धमकी द्यायचा. त्याने आकांक्षा यांच्याकडून अनेकदा पैसेही घेतले होते. ते पैसेही परत दिले नाहीत. त्यांना वेळोवेळी त्रास देऊन त्यांचे जगणे असह्य केल्याने या त्रासाला कंटाळून आकांक्षा यांनी 15 सप्टेंबरला राहत्या घरी पेस्ट कंट्रोलचे औषध प्राशन केले.

उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आकांक्षा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठही लिहून ठेवली आहे. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पटवेकर याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button