breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: ‘ईडी’च्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, मुख्यालय केलं ‘सील’

सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

वृत्तानुसार, काल(दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, करोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दरम्यान, निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत इटलीला मागे सोडून करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button