breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका, नव्या संशोधनातून उघड

टक्कल असणाऱ्या पुरुषांना करोनाची लागण होण्याचा जास्त धोका असल्याचं एका संशोधनातून नुकतंच समोर आलं आहे. काही संशोधकांनी तर टक्कल असणं जोखीम म्हणून ग्राह्य धरलं जावं असा निष्कर्ष काढला आहे. अमेरिकेतील डॉक्टर फ्रँक गॅब्रीन यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संशोधकांकडून हा दावा करण्यात आला आहे. डॉक्टर फ्रँक गॅब्रीन यांना टक्कल होतं. द टेलिग्राफने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

या संशोधनात महत्त्वाची भूमिका निभावणारे ब्राउन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर कार्लोस वॅम्बिअर यांनी द टेलिग्राफशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “टक्कल असणे हे जोखमीचं ठरु शकतं. टक्कल हे करोनाच्या संसर्गासाठी धोकादायक घटक आहे”. चीनमधील वुहान येथून जानेवारी महिन्यात करोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यापासूनची आकडेवारी पाहता करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे.

संशोधक राहणीमान, मद्यपान तसंच स्त्री आणि पुरुषांमधील प्रतिकारशक्ती या सर्व आधारांवर संशोधन करत कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण संशोधन करताना काढलेल्या निष्कर्षानुसार, पुरुषांमधील सेक्स हार्मोन एंड्रोजन फक्त केसगळतीसाठी कारणीभूत ठरत नसून करोनाच्या विषाणूंची पेशींवर हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यातही मदत करत आहे.

प्रोफेसर कार्लोस वॅम्बिअर यांनी सांगितल्यानुसार, “पुरुषांमधील सेक्स हार्मोन करोनाचे विषाणू शरिरात प्रवेश कऱण्यात मदत करतात अशी शक्यता आहे”. दोन वेगवेगळ्या अभ्यासात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये टक्कल असणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचंही समोर आलं आहे.

स्पेनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, तीन रुग्णालयात दाखल करोनाच्या रुग्णांपैकी ७९ टक्के पुरुषांना टक्कल आहे. तर दुसरीकडे अमेरिकन अकॅ़डमी ऑफ डर्मेटॉलॉजीमध्ये १२२ रुग्णांवर करण्यात आलेलं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून यापैकी ७१ टक्के पुरुषांना टक्कल असल्याचं समोर आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button