breaking-newsराष्ट्रिय

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण प्रकरणाची सुनावणी १० सप्टेंबरला

नवी दिल्ली – ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधातील न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणीच्या खटल्याची सुनावणी आता १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी हा खटला योग्य खंडपीठाकडे वर्ग करण्याची विनंती सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांना केली आहे. त्यामुळे यावर पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणीच्या खटल्यात प्रशांत भूषण यांनी सोमवारी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज त्यांना शिक्षा सुनावण्याची शक्यता होती. परंतु न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची विनंती केल्यामुळे त्यावर आज निकाल जाहीर झाला नाही. न्यायालयाचा अवमान करणारे ट्विट केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना फेरविचार करण्यास आणि माफी मागण्यास २४ ऑगस्टपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली होती. त्यानंतरही प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला. १४ ऑगस्ट रोजी न्यायालयालयाने या प्रकरणात प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button