breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात आणखी २३ जणांना रुग्णालयातून सुटी
उपचारानंतर करोनावर मात केलेल्या आणखी २३ जणांना मंगळवारी रात्री रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये आंबेडकर नगर येथील सहा, माळीपूरा, खैर मोहम्मद प्लॉट येथील प्रत्येकी चार, गवळीपूरा, तारफैल, भीम चौक अकोट फैल येथील प्रत्येकी दोन, पंचशील नगर, जुना आळशी प्लॉट व अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.