breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:सिंधुदुर्गात पहिला कोरोना मृत्यू

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतून आलेल्या या कोरोनाबाधित रुग्णाचा 23 मे रोजी मृत्यू झाला होता. मात्र, आज आलेल्या कोरोना चाचणी अहवालात संबंधित संशयित कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं. देवगड तालुक्यातील टेंबवली येथील ही 79 वर्षीय महिला 19 मे रोजी मुंबई येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. मात्र अहवाल येण्याआधीच 23 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता.

या मृत्यूसह सिंधुदुर्ग पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज नवे 06 रूग बाधीत सापडले. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 13 नविन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी (28 मे) दिवसभरात 07 तर आज 06 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांती संख्या 30 इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत 07 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 23 झाली आहे. यात वैभववाडी 01, कणकवली 01, देवगड 01, कुडाळ 01, सावंतवाडी 01, वेंगुर्ला 01 या रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button