breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:देशात 24 तासात 14,516 रुग्णांची वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण 4 लाखांच्या पुढे गेले आहेत. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 410,461 वर गेली आहे. आतापर्यंत 2,27,756 रुग्ण बरे झाले आहेत. या साथीने आतापर्यंत 13,254 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 15,413 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या 24 तासांत 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 55.48% टक्के झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 13925 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तर 169451 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 68,07,226 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. एका दिवसात म्हणेजच गेल्या 24 तासांत 190730 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button