breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भाजपामधला कोणता नेता आवडतो? रोहित पवारांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव

कोणतं मंत्रीपद भूषवायला आवडेल?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे त्यांच्या सडेतोड वृत्तीमुळे चर्चेत असतात. गेल्या चार वर्षांपासून ते मतदारसंघामप्रमाणे राजकीय वर्तुळातही आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडलेली नाही. दरम्यान त्यांनी आपल्याला भाजपामधील कोणता नेता आवडतो या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी ९ एप्रिल रोजी #AskRohitPawar या हॅशटॉगने नेटिझन्सला स्वत:ला कोणताही प्रश्न विचारायचं आवाहन केलं. त्यानंतर नेटिझन्सकडून भन्नाट प्रश्न विचारले जात आहेत. रोहित पवारही त्याला तेवढ्याच मनमोकळेपणाने उत्तरे देत आहेत.

एका युझरने रोहित पवार यांना भारतीय जनता पक्षातील कोणता नेता आवडतो? असा प्रश्न विचारला. यावर रोहित पवार यांनी गडकरी साहेब असं उत्तर दिलं आहे.

तर एका युवतीने आपलं एका तरूणावर प्रेम असून घरचे लग्नाला तयार नाही, तर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलाय, तुमच्यामते मी काय करायला हवं? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा! असा सल्ला दिला आहे. तर एका युझरेन कोणतं मंत्रीपद भूषवायला आवडेल? यावर रोहित पवार म्हणाले की, पद महत्वाचं नसलं, तरी जिथे युवांच्या हाताला काम देता येईल, असं मंत्रिपद नक्कीच आवडेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button