breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:एकाच दिवसात 116 पोलीस कोरोनाग्रस्त

मुंबई : राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आजच्या दिवसात (29 मे) तब्बल 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 2211 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच्या दिवसात महाराष्ट्र पोलीस दलातील 131 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. गेल्या सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

आतापर्यंत एकूण 249 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 1962 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 165 अधिकारी आणि 1051 कर्मचारी अशा एकूण 1216 पोलिसात ही लक्षणं दिसून येत आहेत. कालच्या दिवसात तीन कोरोनाग्रस्त पोलिसांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 25 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button