breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण

वॉशिंग्टन :  जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत १७ लाख ६,२२६ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ९९ हजार ८०५ जणांचा मृत्यू झालाय. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत ४ लाख ६२ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जगभरात गेल्या चोविस तासांत कोरोनाचे ८८ हजार २८८ नवे रुग्ण आढळले असून, ३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ८२  हजारांवर गेली आहे. तर बळींचा आकडा ३ लाख ४७ हजारांवर पोहोचलाय. अमेरिका, रशिया, ब्राझील या देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३ लाख ७६ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर २३ हजार ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ५३ हजार ८३३ रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना १ लाख ९९ ह जार ३१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रशियातही परिस्थिती चिंताजणक आहे. रशियात ३ लाख ५३ हजार ४२७ एकूण रुग्ण आहेत. १ लाख १८ हजार ७९८ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, तीन हजार ६३३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button