EnglishTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

चीनमध्ये कोरोनाचा कहर, विरोधकांच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तरः महाराष्ट्रात काय तयारी?

नागपूर ः चीन आणि अमेरिकेसारख्या देशांत पुन्हा कोरोना महामारीने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीच्या सुचना केल्या आहेत. यासंदर्भात आत विधानसभेतही विरोधी पक्ष नेते यांनी मागील दोन वर्षातील लॉकडाऊन काळाची आठवण करुन देत आता कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे, ज्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रा विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार विधानसभेत म्हणाले की, महाराष्ट्रासह देशाने जगाने कोरोनाची मोठी किंमत चुकवली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यामुळे त्यांना लॉकडाऊन लावावे लागले. पहिली केस आमच्या निदर्शनास आली तेव्हा एक जोडपे दुबईहून आले होते. यानंतर ते गाडीत बसले आणि ड्रायव्हरला कोरोना झाला आणि त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली.

‘जपान, चीन, कोरिया, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चीनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना गाड्यांमध्ये अॅडमिट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २० डिसेंबरला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत काळजी आणि तपासणी करून खबरदारी घेण्याचा सल्ला सर्व राज्यांना दिला आहे. चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार उच्चाधिकार समिती किंवा टास्क फोर्स स्थापन करत आहात का किंवा जगभरातील कोरोनासंदर्भात काय प्रयत्न केले जात आहेत याचा अभ्यास करणारी कोणतीही समिती नेमणार आहात का? असे सवाल अजित पवार यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तात्काळ टास्क फोर्स किंवा समिती स्थापन करण्याची घोषणा केली. यावर फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाने खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. राज्य सरकारकडून केंद्रासोबत समन्वय ठेवला जाईल. यावर एक समिती किंवा टास्क फोर्स गठीत केली जाईल. ती बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवेल आणि बदलत्या परिस्थितीनुसार सल्ले देईल, या सल्ल्याचा पालन केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button