breaking-newsपुणे

#Coronalockdown:पुणेकरांची ऑनलाईन दारु खरेदीसाठी तब्बल 10 हजार 877 जणाची नोंदणी

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ई टोकन पद्धतीला पुणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतलं. तब्बल 10 हजार 877 पुणेकरांनी ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी केली आहे. वाईन शॉप समोरील गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई टोकन पद्धत सुरु केली आहे‌.

ही ई – टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करून ई – टोकन घेणे आवश्यक आहे.

सुरुवातीला ग्राहकानं आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्य विक्री दुकानांची यादी मिळेल. यानंतर एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल.

आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई – टोकन मिळणार आहे. त्यानंतर या टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी संबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button