breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Coronaeffect : सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य कीट देऊन त्यांच्या वेतनात वाढ करा – महापौर माई ढोरे

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

कोरोनाच्या संकट काळात पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षासाधनांचे आरोग्य कीट देण्यात यावे. तसेच ठेकेदारांमार्फत सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही आरोग्य कीट देऊन त्यांच्या वेतनात वाढ करण्याची सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

यासंदर्भात महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी सर्व उपाययोजना करत आहेत. संपूर्ण शहरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. रुग्ण सापडलेले शहरातील भाग सील करून कोरोनाला आहे तेथेच थोपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे करत असताना शहराची दररोज स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किंबहुना आरोग्यदूत असलेल्या या महत्त्वाच्या घटकांकडे प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे.

शहराची स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी दोन प्रकारचे आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आणि ठेकेदारांमार्फत काम करणारे असे दोन प्रकारचे सफाई कर्मचारी आहेत. या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षासाधनांचे आरोग्य कीट महापालिकेने तातडीने द्यावे. त्यात कोणीतीही कसूर होता कामा नये. त्याचप्रमाणे ठेकेदारांमार्फत स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणेत यावी, अशी सूचना महापौर ढोरे यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button