breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेते ऋषी कपूर पंचत्वात विलीन
मुंबई | बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 67व्या वर्षी त्याचं निधन झालं. मुंबईतील चंदनवाडी स्मशानात इलेक्ट्रिक प्रणालीद्वारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजीव कपूर, रणधीर कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, करीना कपूर, आलिया भट्ट, अभिषेक बच्चनसह 20 जण सामिल झाले होते.
तर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सामील होऊ शकली नाही. रिद्धिमा साऊश ईस्ट दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनी ईस्ट येथे राहते. रिद्धिमाला मुंबईत येण्यासाठी पोलीस मूवमेंट पास जारी करण्यात आला. रिद्धिमा कपूर प्रायव्हेट जेटने सांयकाळी 6 वाजता मुंबईत पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे.