Uncategorized

करोनामुळे पांरपारिक पद्धतीला फाटा देत मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ वारकरी जोडीला मिळणार आषाढीच्या पूजेचा मान

पंढरपूर: आषाढी वारीच्या महापुजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दांपत्याला मिळाला आहे. गेल्या 20 वर्षापासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. हे दांपत्य वर्धा जिल्ह्यातील आहे आज मंदिरातील सहा विणेकऱ्यांमधून चिट्टी टाकून मानाचा वारकरी निवडण्यात आला. कोरोना संसर्गामुळं वारी पांरपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं होण्याऐवजी नियमांसह होत असल्यानं मानाचा वारकरी निवडण्याची परंपरा बदलण्यात आली आहे.

 

मानाचे वारकरी असणारे केशव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील असून त्यांचे वय ७१ वर्षे आहे. गेल्या वीस वर्षापासून ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील वर्षीपासून वारी भरत नसल्याने महापूजेचा मान विणेकर्‍यांना देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानुसार यंदा केशव कोलते यांना हा मान देण्यात आला आहे.

 

आषाढी वारी दरम्यान मानाचा वारकरी एकादशीच्या दिवशी बारी बंद केली जाते, त्यावेळी दारावर असणाऱ्या वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान दिला जातो. मात्र, कोरोनामुळं मंदीर बंद असल्यानं मंदिराचे सेवेकरी यांच्यात चिट्टी टाकून यंदा निवड करण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button