breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय…उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; महाविकास आघाडी सरकार कोसळले!

मुंबई: गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली. त्यासोबतच त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आपल्या सर्वांच्या सहकार्यानं वाटचाल केली. सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यांना कर्जाच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा बीड पॅटर्न सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं. उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतर केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व चांगलं सुरु असताना काही जणांची नजर लागली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासोबत विधानपरिषदेचा राजीनामा दिला.

औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मांडला त्यावेळी शिवसेनेचे केवळ आम्ही चार जण होतो, याचा खेद वाटला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी ठरावाला एका शब्दानं विरोध केला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, ज्यांना मोठं केलं, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं नाराज झाली आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही ते हिमतीने समोर, याला म्हणतात माणुसकी, शिवसेना, शिवसैनिक असं उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यायदेवतेचा निर्णय आला, उद्या राज्यपालांचा फ्लोअर टेस्टचा आदेश आला आहे. राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखत पत्र मिळताच २४ तासात पत्र दिलं आहे. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी लटकून पडली आहे. राज्यपालांनी तो निर्णय घेतला असेल तर आम्हाला त्यांच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित होईलस असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर अशोक चव्हाण म्हणाले की तुमच्या लोकांचा विरोध असेल तर आम्ही बाहेर पडून पाठिंबा देतो, मी म्हटलं वेडेपणा करु नका. नाराजी आहे तरी कोणावर, गुवाहाटी-सूरत ऐवजी वर्षा-मातोश्रीवर येऊन सांगायचं होतं. माझ्या पुढे येऊन बोलायचं होतं, मी ऐकून घेतलं असतं, असं म्हणत त्यांनी म्हटलं.

मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत, इतकं नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

आम्ही हपालेले होऊन जात नाही मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार..

उद्धव ठाकरेंचे सर्व प्रयत्न निष्फळ

गेल्या १० दिवसात ठाकरे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. एक अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी काल बंडखोर शिवसेना नेत्यांना भावनिक सादही घातली. मात्र, बंडखोर शिंदे गट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर भाजपने खेळी केली. देवेंद्र फडणवीसांनी २८ जूनच्या रात्री राज्यपालांना पत्र देत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या विशेष अधिवेशन घेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.

राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर ठाकरे सरकारला काहीही दिलासा दिलेला नाही. बहुमत चाचणी होणारच असं न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

राजकारणाचा सुपरहिट सिनेमा, हिरो कोण आणि व्हिलेन कोण?

भाजप-शिवसेना युतीचं पाच वर्षांचं सरकार, त्यानंतर अडीच-अडीच वर्षांचा प्रश्नावरुन या युतीत पडलेली फूट, त्यानंतर शिवसेना -राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून स्थापन केलेलं ऐतिहासिक असं महाविकास आघाडी सरकार आणि आता पुन्हा अडीच वर्षांनंतर शिंदे गटाच्या बंडाळीमुळे मविआची ताटातूट. या काही वर्षात महाराष्ट्राने राजकारणाचा अॅक्शन, कॉमेडी, थ्रील, सस्पेन्स, ड्रामा असलेला सुपरहिट सिनेमा पाहिला. यामध्ये वेळोवेळी हिरो आणि विलेनची भूमिका बदलताना आपण पाहिली. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे हिरो होते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसताच फडणवीस विरोधी भूमिकेत दिसले. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीचे हिरो ठरले. त्यांनी अडीच वर्ष सत्ता टिकवून ठेवली. मात्र, राजकारणातले चाणक्य मानले जाणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातात घेतली आणि अखेर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button