breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Corona: पुण्यतील परिस्थिती बिघडतेय; मृतांचा आकडा 487 वर

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे शहराची अवस्था अत्यंत बिकट, चिंताजनक आहे. मागील काही दिवसापासुन कोरोना विषाणू रुग्णांची संख्या भरमसाठ वेगाने वाढतेच आहे. बुधवारी ४६० रुग्णांची भर पडली तेव्हा सर्वांचे डोळे पांढरे झाले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (१८जून) ४७२ रुग्ण आढळले. पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गुरुवारी दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या ११ हजार ११५ आणि मृतांची संख्या ४८७ पर्यंत पोचली आहे.
देशभरात करोना विषाणूचे रुग्ण वेगाने वाढत आहे, अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे.कोरोनावर उपचार घेणार्‍या १९३ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६ हजार ९०६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पुणे शहरात वाढती रुग्ण संख्या गंभीर होऊन बसली आहे. आता ही रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन काय, उपाययोजना करते पाहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button