breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

फेसबुक लाईव्ह पर्यायामध्ये काही नवे फिचर…

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक ऍपच्या वापरामध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आता फेसबुकच्या वापरामध्येही वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. अमेरिकेत फेसबुक लाईव्ह फिचर वापरण्याच्या प्रमाणात सुमारे ५० टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फेसबुकने आपल्या लाईव्ह पर्यायामध्ये काही नवे फिचर देण्याचे निश्चित केले आहे.

फेसबुक ऍपचे प्रमुख फिजी सिमो यांनी नवीन फेसबुक लाईव्ह फिचरबद्दल माहिती दिली. या नव्या फिचर्समध्ये सर्वात वेगळे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकवर नसलेल्या लोकांनाही फेसबुक लाईव्ह ऐकता येईल. यासाठी फेसबुक लाईव्हमध्ये फक्त ऑडिओ हा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. फेसबुकवर नसलेले किंवा लॉगआऊट केलेले युजर्सही या पर्यायामुळे लाईव्हवरील चर्चा, संवाद ऐकू शकतील.

हा पर्याय सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुककडून लवकरच टोल फ्री डायल इन पर्याय देण्यात येईल. या डायल इनच्या माध्यमातून कोणीही फेसबुक लाईव्हवरील चर्चा ऐकू शकणार आहे… 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button