breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरण; बीडच्या तरुणाला अटक

बीड |
उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणात बीडशी संबंधित धागेदोरे मिळाले असून अटक करण्यात आलेला इरफान शेख हा सिरसाळा (ता. परळी) येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. इरफानचे बालपण सिरसाळ्यात गेले आहे. इरफानचे दोन भाऊ सिरसाळ्यात तर एक भाऊ परळीत वास्तव्यास आहे. इरफान खाजा शेख याला उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी दिल्लीत ताब्यात घेतल्याचे मंगळवारी समोर आले. दिल्लीतील बाल कल्याण मंत्रालयात इंटर प्रिपेटर म्हणून शेख काम करत होता. मागील काही वर्षांपासून तो दिल्लीतच वास्तव्यास असल्याने गावाशी त्याचा फारसा संपर्क नाही. बालपण सिरसाळ्यातच गेले असल्याने आणि काही दिवसापूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात इरफानचे कौतुक केले होते. याबाबत स्थानिक पोलिसांना कसलीही माहिती नाही.

इरफान शेख याचे वडील खाजा शेख हे बसचालक होते. काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले. पाचसहा वर्षांपासून इरफान शेख दिल्लीला असल्याचे सांगितले जाते. तो मूकबधिर नागरिकांसाठी काम करत आहे एवढेच आम्हाला माहीत होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. इरफान शेख हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. सासुरवाडी परळीतीलच असून सासरे एका शाळेवर शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सिरसाळा येथील त्याच्या घराला कुलूप असून आई व भाऊ परिवारासह बाहेरगावी गेल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले. दहशतवादी कारवाई प्रकरणासह पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटातही बीडचे नाव समोर आले होते. तर काही दिवसांपूर्वी टुल किट प्रकरणातही बीडच्या एका तरुणाला अटक करण्यासाठी दिल्लीचे पोलीस येथे येऊन गेले होते. आता बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातही बीडचा संबंध आल्याने देशपातळीवर चर्चा होत आहे. अहमदाबाद येथे आयोजित विद्यालयातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खाजा शेख याचे कौतुक केले होते. मोदींनी शाबासकीची थाप टाकत उत्कृष्ट दुभाषकाबद्दल सन्मानित केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button