breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरने दुचाकीवरील चौघांना चिरडलं; आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

पिंपरी : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. किवळे- देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेत एकाच वेळी मायलेकीने जीव गमावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button