breaking-newsपिंपरी / चिंचवड

पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे पिंपरी पालिकेच्या महासभेला येणार का ?

महापाैर राहूल जाधव यांची फोनवरुन विनंती 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पीएमपीच्या विविध विभागात काम करणारे 154 कर्मचारी महापालिकेत वर्ग करणे, मिडी बस खरेदी करणे, शहरातील वेगवेगळ्या मार्गावरील अचानक बस सेवा बंद करणे, यासह विविध प्रश्नावर अनेक नगरसेवकांना म्हणणे मांडायचे आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) होणा-या सर्वसाधारण सभेला पीएमपी व्यवस्थापकीय अध्यक्षा नयना गुंडे यांना महापाैर राहूल जाधव यांनी फोन करुन सर्वसाधारण सभेला उपस्थितीत राहण्याच्या विनंती केली आहे. मात्र, पीएमपी अध्यक्षा गुंडे या महापालिकेच्या महासभेला उपस्थितीत राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्या उपस्थितीत न राहिल्यास प्रसंगी पीएमपीचे सर्व विषय तहकूब ठेवण्यात येतील, असा विनंतीवजा इशारा महापाैरांनी दिला आहे.  

गतवर्षी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे  यांनी पीएमपी शहरातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पीएमपी व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी स्थायीच्या बैठकीला उपस्थितीत राहण्याचे सांगितले होते. परंतू, मुंडे हे बैठकीला आलेच नाहीत. मुंडेना अनेक पत्र दिली, त्यांचे विषय तहकूब ठेवले, तरीही त्यांच्यावर कसलाही परिणाम जाणविला नाही. मात्र, स्मार्ट सिटी प्रा. लि.च्या पहिल्या बैठकीसाठी ते महापालिकेत उपस्थित राहिले होते.

दरम्यान, महापाैर राहूल जाधव यांनी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांना फोन करुन पीएमपीच्या विविध प्रश्नावर नगरसेवकांना म्हणणे मांडून चर्चा करायची आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची आॅगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा उद्या ( गुरुवारी दि.6) दुपारी दोन वाजता होणार आहे. त्याला तुम्ही उपस्थितीत राहावे, असे सांगितले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button