breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाला दिलासा : लाच प्रकरणात स्थायी समिती सभापतीसह पाच जणांना बिनशर्त जामीन

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना शिवाजीनगर सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला दिलासा मिळाला आहे.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि.१८) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.१९) अटक केली. होती. न्यायालयाने आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा २३ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

सोमवारी सकाळी ११ वाजता पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये सर्व आरोपींना २५ हजार रुपयांची हमी घेऊन जामिन मंजूर करण्यात आला आहे. आणि दर महिन्याच्या पहिला शनिवारी आणि तिसऱ्या शनिवारी नजीकच्या पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासाठी जावे लागणार आहे. दरम्यान याबाबत चौकशीत १६ जणांची नावे समोर आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या १६ जणांवर काय कारवाई करणार याबाबत राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button