breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

पाथर्डीतील शेतात दडवलेला ५८ लाखांचा गांजा जप्त

  • दरोडय़ाचा तपास करताना पोलिसांना अचानक साठा सापडला

नगर |

दरोडय़ाच्या गुन्ह्यचा तपास करत असताना पोलिसांना अचानक उसाच्या शेतात दडवलेला गांजाचा प्रचंड मोठा साठा आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ रुपये असावी. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज, रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तहसीलदार व वजन मापे निरीक्षकांच्या उपस्थितीत सायंकाळपर्यंत या गांजाची मोजदाद करण्याचे काम सुरू होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गांजा ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ आहे. एक किलो गांजाची किंमत सरकारी दरानुसार साडेसात हजार रुपये गृहीत धरण्यात आली आहे.

शंकरवाडीलगतच्या एका उसाच्या शेतात पाथर्डी व नेवासे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त करत दोन महिलांना ताब्यात घेतले. सावित्री बापू आव्हाड व सुमन साहेबराव आव्हाड (दोघी रा. शंकरवाडी, पाथर्डी) अशी दोघींची नावे आहेत. जेथे गांजा पकडला तेथील शेतातच या दोघी राहतात. यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेवासे तालुक्यातील चांदा येथील एका दरोडय़ाच्या गुन्ह्यचा तपास नेवासे पोलीस करत असताना त्यांना पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथील उसाच्या शेतात गांजा असल्याची माहिती समजली.

त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना दिल्यानंतर त्यांनी या शेतात छापा टाकण्याचे आदेश पाथर्डी व नेवासे पोलिसांना देत ते स्वत: या कारवाईत सहभागी झाले. आज सकाळी आठच्या सुमारास मुंडे यांच्यासह पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे, सोनईचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, शनिशिंगणापूरचे सहायक निरीक्षक सचिन बागुल, पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी भगवान सानप, देविदास तांदळे, अनिल बडे, पोपट आव्हाड, एकनाथ बुधवंत, महिला पोलीस कर्मचारी प्रतिमा नागरे यांचे पथक शंकरवाडी येथे गेले व त्यांनी तपासणी केली असता उसाच्या शेतात शंभर मीटरावर गांजाचा मोठा ढीग लपवलेले आढळला. हा सर्व गांजा २ ते १० किलो वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आढळून आला. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला. गांज्याच्या सर्व पिशव्या शेतातून बाहेर आणताना पोलीस कर्मचाऱ्यांची मोठीच दमछाक झाली.

  • परराज्यातून आल्याचा व वितरणासाठी दडवल्याचा अंदाज

जप्त केलेला गांजा दोन व दहा किलोच्या वजनात, यंत्राचा वापर करून ‘पॅकिंग’ केला असल्याने तो परराज्यातून आला असावा असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान समजलेल्या माहितीनुसार नेवासे तालुक्यातील चांदा येथील दरोडा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींचा गांजा प्रकरणात हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गांजा सापडण्याची ही गेल्या काही वर्षांतील जिल्ह्यतील पहिलीच वेळ आहे. वाहतूक करताना मध्येच पाथर्डीसारख्या आडबाजूला तो वितरणासाठी दडवला गेला असावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button