breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

भाजपाकडून अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं तिकीट

मुंबई | राज्यात सहा जागांसाठी २८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्या अर्ज सादर करण्याची शेवटचा दिवस आहे. यातच भाजपाने राज्यसभा उमेदवारासाठीची नवी यादी जाहीर केली आहे. तर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्त कट करण्यात आला आहे.

भाजपाने महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून एक एक उमेदवार देण्यात येणार आहे. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा    –      ‘देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार…’; संजय राऊतांचं विधान चर्चेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button