ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून सांत्वन

पिंपरीः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांचे सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हे सर्वजण त्यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्वनी जगताप, बंधू शंकर जगताप व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांसोबत संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button