breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा बोजवारा- चित्रा वाघ

वाई |

राज्य शासनाकडून बलात्काऱ्यांना आश्रय नाही तर राजाश्रय देण्याचे काम होत असल्याचे व राज्यमंत्री मंडळात बसलेल्या मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप होत आहेत असे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. सातारा औरंगाबाद लातूर येथे लिंगपिसाट अधिकाऱ्यांची भरती झाली आहे. महिलांची कामे होण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शरीर सुखाची मागणी केली जात आहे. त्यांच्याबद्दल तक्रार केली असता त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. साताऱ्यामध्ये गटशिक्षण अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची शिक्षकेकडे मागणी केली जाते अशा घटनांचा मी निषेध करते असे सांगत त्यांनी पीडित मुलींच्या राहण्याची व शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे असे सांगितले.

राज्यातील पोलिस दलातील महिला देखील सुरक्षित नसून राज्यात दोन गृहराज्यमंत्री आहेत पण त्यांची नावे आणि ओळखच जनतेला नाही असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. महिलांना आणि मुलींचा विनयभंग आणि वेगवेगळी मागणी करणारे अधिकारी हे कोणाचा आदर्श घेत आहेत. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर ही बलात्काराचा आरोप आहेत. मंत्रीच असे वागत असेल तर अधिकाऱ्यांच्या मनात भीतीची राहणार नाही. सिल्लोड येथील एक महिला तक्रार देण्यासाठी गेले असता तिच्यावर ही तिलाही ती त्या पोलिस अधिकाऱ्याकडून अशी मागणी करण्यात आली, लातूर येथे एका सामाजिक कल्याण खात्यातील अधिकाऱ्याने अशा प्रकारची मागणी केली आहे. पास्कोच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. तेरा चौदा वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री याबाबत कोणतेही गांभीर्याने नाही.

अशा घटना घडल्यानंतर ही पालकमंत्र्यांनी किंवा संबंधितांनी या कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. त्यांना आधार दिलेला नाही. छोट्या छोट्या गावात राहणाऱ्या कुटुंबीयांची अवस्था फार विचित्र आहे. त्यामुळे सरकारने अशा पीडित मुलींच्या राहण्याची व शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. दररोज महिलांच्या बाबतीत विविध घटना घडत आहेत. महिला अनेक ठिकाणी चांगले काम करत असतानाही त्यांना वाईट वागणूक दिली जात आहे. पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत असं चित्र दिसत आहे .त्यामुळे पोलिस खाते या गुन्हेगारांच्या हातात हात घेऊन काम करत आहे का काय असे वाटत आहे .महिला सुरक्षा बाबींचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे .सत्तेवर असणाऱ्या सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी महिलांना संरक्षण दिले पाहिजे सगळे कायदे धाब्यावर बसवले जात आहेत .त्यामुळे सरकारने बी समरी तक्रारींचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे.राज्यात पालकमंत्री आणि मंत्री अजिबात दिसत नाहीत. मनोधैर्य योजनेतील निधी तात्काळ या मुलींना मिळाला हवाय,आदी बाबी त्यांनी प्रकर्षाने मांडल्या.आज त्यांनी बाल लैंगिक अत्याचारातील मुलींच्या कुटुंबीयांची आणि पीडित शिक्षिकेची भेट घेतली. यावेळी विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी ,प्रशांत खामकर, मनीषा पांडे, रीना भणगे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button