breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा… तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला – शरद पवार

मुंबई |

महाराष्ट्रातील शेतकरी… कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला…जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा… तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटद्वारे एन. डी. पाटील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. एन. डी. पाटील यांनी उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले होते याची आठवणही शरद पवार यांनी ट्वीटमध्ये सांगितली आहे.

शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रती या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करताना शरद पवार यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button