breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

Seema Haider : सीमा हैदर ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढविणार!

Seema Haider : पाकिस्तानमधून प्रियकरासाठी चार मुलांसह अवैधरित्‍या भारतात आलेली सीमा हैदर सध्‍या चर्चेचा विषय ठरली आहे. सध्‍या ती प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत आहे. ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोपही झाला होता. आता सीमा हैदर आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकीची निवडणूक लढवू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सीमा हैदरला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्‍यात आली आहे. तिने ही ऑफर स्वीकारली आहे. सीमा हैदर यांना महिला संघटनेच्या अध्यक्षा बनवता येऊ शकते. त्‍यांचे वक्तृत्त्व चांगले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाचे प्रवक्तेपदही दिले जाऊ शकते. सुरक्षा संस्‍थांनी अद्याप सीमा हैदर यांना क्लीन चिट दिलेली नाही. त्‍यांना क्लीन चिट मिळाल्‍यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्‍या एका नेत्‍याने सांगितले आहे.

हेही वाचा – राहुल गांधी यांना सर्वेच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, खासदारकीही परत मिळणार

दरम्यान, सीमा हैदरला एनी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटात काम करण्याचीही ऑफर दिली आहे. चित्रपट दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमा हैदरची ऑडिशन दिली. टेलर मर्डर स्टोरीमध्ये सीमा भारतीय बाजूच्या रॉ एजंटची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button