breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Tesla : टेस्लाचं भारतातील पहिलं ऑफिस पुण्यातीय ‘या’ ठिकाणी होणार

पुणे : अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार आहे. त्यासाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. ऑटोमोबईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला टेस्लाच्या येण्याने प्रगतीच्या अणखी संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतात इलेक्ट्रिक कारचं उत्पादन सुरू करण्याची तयारी करणाऱ्या टेस्लाने कार्यालयीन कामकाजासाठी पुण्यातील विमान नगर भागात पंचशील टेक पार्कची निवड केली आहे. इथल्या पहिल्या मजल्यावरील ५ हजार ८०० स्क्वेअर फूट जागा टेस्ला कंपनीनं तीन वर्षांसाठी भाड्यानं घेतली आहे. याचं मासिक भाडं ११.६५ लाख रूपये आहे.

हेही वाचा – आकुर्डीसह आदी परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त सकारात्मक!

दरम्यान, भारतात सध्या अनेक इलेक्ट्रिक कारचे मॉडेल्स रस्त्यावर धावताना दिसतात. पण टेस्लाचे आगमन झाल्यानंतर इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेचीच नाही तर एकूण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची गणितं बदलून जाणार आहेत. कारचं उत्पादन टेस्ला कुठं करणार? हे अजून स्पष्ट नसलं तरी पुण्याजवळ चाकण किंवा रांजणगाव एमआय डीसी सारखे पर्याय कंपनीला उपलब्ध आहेत. २०२२ साली टेस्लाने १३ लाख इलेक्ट्रिक कारची निर्मिती करून त्यांची जगभरात विक्री केली आहे. २०२३ पर्यंत हे उत्पादन वाढवून दोन कोटी इलेक्ट्रिक कारपर्यंत नेण्याचा एलॉन मास्क यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button