breaking-newsमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाःकार माजवला आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ९ हजार ५०९ नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. यासह आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. तर काल २६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात आतापर्यंत १५ हजार ५७६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर २ लाख ७६ हजार ८०९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी मुंबईत कोरोनाचे १ हजार १०५ नवे रुग्ण आढळले, तर ४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख १६ हजार ४५१ वर पोहोचली असून यापैकी ८८ हजार २९९ जणांना कोरोनावर मात करण्यात यश आले आहे. तर सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने रविवारी ९० हजारांचा आकडा पार केला. रविवारी रात्री ही संख्या ९० हजार ३९३ इतकी झाली, यापैकी आतापर्यंत ६० हजार २७२ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या शहर आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत २८ हजार २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दिवसभरात पुण्यात ३ हजार १७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, यापैकी पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ७६२ रुग्ण आहेत. तर दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा २ हजार ८४ वर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button